महामारी वर्ष
महामारी वर्ष
नवीन वर्षाचा सर्वांना किती होता हर्ष,
पण नवीन वर्ष निघाले महामारीचे वर्ष.
कोनाला चाहुल होती नौकरीची,
तर कोणाला नविन जीवन साथीची.
कोनी होनार होते मम्मी-डैडी
तर कोनी होनार होते आजोबा-आजी.
सर्वांच्या भावनाची कशी झाली माती,
महामारी ने दाखवली आपली शक्ति.
भट-भक्तांची नाही कामाची भक्ति,
महामारी योध्दांची फक्त कामी आली युक्ती व शक्ती.
प्रकृती कोपाची अफाट आहे लीला,
विज्ञानाला आव्हान देणारी प्रकृतीची लीला.
जगाचे आर्थिक चक्र जागीच रोखले,
महामारी पेक्षा बेरोजगारी वजन वाढले.
महामारी लसिचे महत्व सर्वत्र वाढले,
जिव्हाळ्याच्या माणसापेक्षा लसीचे गांभीर्य कळले.
दारोडे आहे फक्त आर्थीक प्रगतीचे स्त्रोत,
कृषि ने लावला सोबत अर्थ व्यवस्थेला हात.
सफल जीवनासाठी पाहिजे अन्नदाताची साथ,
कृत्रिम जीवनशैलीची महामारीने लावली वाट.
