महामानव
महामानव
बाबा तुमच्या लेखणीची धार
करी प्रत्येक अन्यायावर वार
तळपती तलवार तुमची लेखणी
संविधानरुपी दिसे अधिक देखणी
तुम्ही प्रज्ञासूर्य तुम्हीच बोधिसत्व
तुम्हामुळेच कळले आम्हा जगण्याचे तत्व
माणसाला माणसाचे दिले तुम्ही स्थान
तुमच्यामुळे मिळे आम्हा समाजात मान
कमरेला झाडू अन मडके होते गळ्यात
हे पाश तोडूनी सारे आणिले आम्हा माणसात
जनावरांचेही जगणे होते आम्हांहूनी बेहत्तर
तुम्हीच घडविले अमुचे भविष्य बलवत्तर
तुम्ही ज्ञानाचा अफाट , अथांग महासागर
तुमच्या किर्तीचा डंका वाजतोय जगभर
देशावर आहे तुमच्या घटनेची सत्ता
जगानेही मान्य केली तुमची विद्ववता
अस्पृश्य म्हणुनी ज्यांनी ठेविले तुम्हा वंचित
संविधानाने घडविले तुम्ही त्या साऱ्यांचे संचित
ध्रुवासम अढळ आहे जगी तुमचे स्थान
तुमच्या चरणी बाबा माझे कोटी कोटी प्रणाम
