महागाई
महागाई
भिडले गगनाला भाव झाले पोटाचे
ओझे सामान्य जनता झाली बेजार,
आता सांगा जगायचे तरी कसे ?
रात्रंदिवस मेहनत करून उतरेना
कर्ज डोक्यावरच वाढता,
वाढते महागाई
कधी ओला दुष्काळ
कधी सुखाकाळ
हजारो समस्यांनी ग्रस्त बळीराजा
करीत असतो मग मरणाची घाई
गॅस भाव वाढला, महागले पेट्रोल, डिझेल सर्व काही
चटके सोसत या महागाईने होरपळून निघते जनता
तरी सरकारला चिंता नाही
लोकशाही देशामध्ये "शाही" लोकांची मजा
आम जनतेला मात्र महागाईची मिळते सजा
कसे करावे सणवार साजरे
मनी खंत वाटे डोळ्यातील येई पाणी
चला तर महागाई वर बोलू काही
बोलल्या शिवाय पर्याय नाही..
