STORYMIRROR

Pappu Tekale

Others

3  

Pappu Tekale

Others

मग का ती बळी पडते.?

मग का ती बळी पडते.?

1 min
11.8K

समाजाने नाकारलं तिला

खचून नाही गेली ती...

सांभाळत चुल आणि मुल

जगाला पुरून उरली ती...

दगड माती शेन झेलले

पण मागे ना हटली ती...

ज्यांनी दिल्या तिला वेदना

त्याचसाठीचं झटली ती...

आडवले वेळोवेळी तिला

प्रत्येक क्षेत्रात पोहचली ती..

नवे विचार मांडले तिने पण

प्रथा परंपरा जपते ती...

किती सुदंर, मोहक,चतुर

मायाळू,गोंडस असते ती..

इतकं सारं असताना ही

मग का बळी पडते ती...


Rate this content
Log in