मेष राशी
मेष राशी

1 min

229
रूप त्याचे रुबाबदार
बोलणं असतं धारदार
एक घाव दोन तुकडे
हेच मेषेचं तत्त्व फार
डौलदार बाहू त्याचे
नजर असते करारी
नडायला जाऊ नका
देईल मेंढा धडकी
कर्माला देतात महत्त्व
हळवेपणा रुचत नाही
तेजतर्रार बोलणं यांचं
जीवाला झोंबते भारी
मेहनत अन् चिकाटीने
सर्व काही मिळवतात
कामाशी प्रामाणिक
मेषेची माणसं असतात