मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही

1 min

12.5K
व्यसन व्यसन असत म्हणे
नशा करण्यात मजा काही वेगळी
नाही समजणार केल्याशिवाय...
समजवतात सर्व लहानपणी
नका जाऊ नशेच्या आहारी
सागणाराही नशेतच सांगतो...
गांभिर्य ना कोणाला
सरकारच 'इनकम' ह्यावर
तिजोरी भरण्या पुरवता नशेबाजांचे लाड...
स्वतःच्या जबाबदारीवर
जो तो धावतो नशा भुक भागवण्या
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात हेच खरे...