मेजवानी ....
मेजवानी ....
सळसळत्या तेलात मोहरीची फोडणी ....
चटकदार मसाल्याची आमटी ....
आले लसूण भरुन भाजलेले मासे ....
चमचमीत अशी भाजी ..
अशी असते माझ्या आईच्या हातची मेजवानी...
तिच्या हाताचा प्रत्येक पदार्थ माझ्या आवडीचा ..
नाही कोणता फरक आगळावेगळा ....
आठवतात मला तिचे पदार्थ जेव्हा मी पोहोचले माझ्या सासरी ....
दरवळते ती चव जिभेवर अजूनही ....
आता नाही मिळत मला दररोज खायला तिच्या हाताचे पदार्थ ...
आठवणीत राहिली ती रुचकर चव माझ्या मनात ...
पण गेली मी माहेरी कि असते तिची ती खास माझ्यासाठी मेजवानी लज्जत ...
