मेहंदी
मेहंदी
1 min
246
लालचुटूक मेहंदी हातावरची
दिसते कितीतरी ग छान
पाहतच राहावेसे वाटते
हरपून जाते सर्वांचे भान......
सणावाराला लावतो मेहंदी
लग्नात हात मेहंदीने सजती
नभांगणातील सूर्याप्रमाणे
रंगछटांमधे नारंगी,लाल भासती...
गोबर्या हाताची वाढवते शान
ही लाल,लालचुटूक मेहंदी
मुली ,बायकाची आवडती ही
होती सदा या सार्या आनंदी....
आत्ताची आहे फॅशन हो ही
पण ही तर परंपरा भारताची
कथा आहे मेहंदीची महान
पणजीच्याही आधीच्या युगाची....
हळद लागताच मेहंदीला
मेहंदीचा रंग लयी भारी खुलला
नवरी चालली सासुराला
माहेरी आश्रूंचा पूर आला.....
