मेघराज
मेघराज
1 min
385
युगानुयुगे आपले नाते
सांगु सगळ्यांना
आलो परत भेटण्याला
वैशाख वणवा आता सम्पला
गगन मंडपी मांडव घातला
नभी दाटलो आता मी ही
झालो अधीर मिलनाला
आलो परत भेटण्याला
कणा कणात भिजवीन तुला
कुरवळींन मी डोंगर दऱ्याला
कडाडून नभी वीज रेघ ही
पसरला सुगन्ध धरतीला
आलो परत भेटण्याला
अनादी अनंत मिलन आपले
होतील आनंदी चराचर सगळे
परंपरेचे गीत आळवुन
करू नमन सृजन संस्कृतीला
आलो परत भेटण्याला
युगानुयुगे आपले नाते
सांगु सगळ्यांना
आलो तुझ्या मिलनाला
