मधुर
मधुर
1 min
328
प्रभात मधूर आहे,
दिशा तांबडी,
फुलांच्या झाडामधुन,
कोण येत आहे.?
हिरवी झाडी आहे,
हिरवी वनराई,
घरट्यातून पहा कसे,
पक्षी उडत आहे.
नदी वाहते आहे,
वळणे वाकडी,
खळखळ नाद,तिला
कोण देतं आहे ?
वेलीला फुले बघ,
कशी आली
कळी ही सोबत,
उमलून गेली.
विशाल गगन आहे,
त्याला,क्षितिज आहे,
क्षितिजा पलिकडे,
सांग कोण आहे ?
तुझ्या आणि,माझ्या,
जिवनात सारे,
मधुर आहे,
सांग सांग,प्रिये तू,
कोण मधूर आहे ?
