STORYMIRROR

Vineeta Deshpande

Others

4  

Vineeta Deshpande

Others

मौन

मौन

1 min
462


भेगाळलेल्या पांढरीवर

मौन विखुरले होते


उध्वस्त जीर्ण भिंतीत

मौन निशब्द होते


दुभंगलेल्या मूर्तीत

मौन स्तब्ध होते


मुक्या अवशेषांच्या कुशीत

मौन दडून होते


मातीच्या गहन गर्भात

मौन गूढ होते


अनाहूत प्रहाराने

मौन दचकले होते


इतिहासाच्या पानावरती

 मौन विविक्त होते


Rate this content
Log in