मैत्रीण
मैत्रीण
माझा विवाह झाला
मी पुण्यात आले
वंदनाचा विवाह झाला
तिलाही पुण्यात दिले.....
पुण्यात माझे सासर
होते जवळ मुकुंदनगरला
वंदीचे सासर होते
माझ्याजवळ सहकारनगरला...
दोघींचे संसार सुखाचे होते
दोघींचे पती एकाच कंपनीत
आम्हांला एका वर्षात झाली मुले
रमलो दोघी आपापल्या संसारात...
पाचच वर्षात माझे बस्तान
निगडिला बसवावे लागले
वंदनाचेही घर तेथे होते
आनंदनगरला बस्तान बसले...
आम्ही आठवड्यातून भेटायचो
मुलांना एकत्र खेळवायचो
मस्त पार्ट्या करायचो
मनाला येईल तसे जगायचो....
कुटुंबाची हेळसांड केली नाही
आम्ही दोघींनी सासरचे सारे जपले
पुढे पुढे आमचे सासरचेही एकत्र
पार्टी करण्यात रमायला लागले....
पार्टी म्हणजे एकत्र येणे अन
मिळून सुखदुःखाची वाट काढणे
सर्वांचे विचार ऐकून घेवून
विचारांची देवाण घेवाण करणे...
मुले मोठी झाली आता हो
लग्नही त्यांची छान झाली
मुले त्यांच्या संसारात रमू लागले
पण आमची मैत्री जशीच्यातशी राहिली....
आज या मैत्रीला झाले पन्नास वर्ष
ही मैत्री अर्ध शतकातील आहे महान
खरचच एवढी वर्ष मैत्रीतील सातत्य
नाही हो खरचच या युगात सहान....
देवा अशीच ही मैत्री टिकू दे
आनंदाने, हर्षाने, सुखाने फुलू दे
नको आता कोणतेही दुःख जीवनी
जर आली दुःखचं तर सोसण्याचे बळ दे....
*वंदना माझ्याकडून तुला ही माझी कविता आजच्या दिनी तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट करते.*
*Happy birthday dear vandi*
