STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

मैत्रीची भाषा

मैत्रीची भाषा

1 min
151

व्हाट इज युवर मदर टंग 

करत मैत्रीचा हात समोर आला

जावे ज्या देशा अनुसरून

उत्तर आम्ही देत असु

मराठी म्हणताच

पुस्तकी की बोलीभाषा

संवादासाठी मग सामना

पुणेरी विरूद्ध वर्हाडी

रंगत गेला न्यारा...

पेन भेटला कि मिळाला?

पुणेरी म्हणती मिळाला

वर्हाडी म्हणती भेटला...

र्निजीव पेनाला का भेटला 

पुणेर्याने केला सवाल... 

वर्हाडी तावा तावा 

बोलु लागला 

माझा पेन मला भेटलाच बे

शब्दा शब्दा मग 

संवादातच दोघात जुंपायाची...

अहिराणीवाला गेला भांडण सोडवाया 

पण बोलीभाषेत तोही अडकला...

झाडी, कोकणी, मालवणी अशा नानाविध बोलीभाषा

असे आमुच्या मायबोली मराठीच्या लेकी सुना

नटुन थटुन शब्द अलंकाराने राज्य करते 

आमच्यावर ही मैत्रीची मायबोली मराठी भाषा....

हात हातात घेते, हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्द

लाडीगोडीने रंगत जाते आमचे मैत्रीचे संवाद...


Rate this content
Log in