मैत्री
मैत्री
1 min
421
मैत्री
दोन देह, एक आत्मा
मैत्रीसाठी अश्रू गळाले
खुद कृष्ण परमात्मा
मैत्री
गरीब-श्रीमंतीला नाही मोल
सुदामाच्या गाठोड्यातले
कृष्ण भगवंताने खाल्ले होते
पोह्याचे मूठ भरभरून गोळ
मैत्री
मैत्री असते वचनबद्ध
कर्णाला ठाऊक होते
दुर्योधनाचे हट्ट
तरी मैत्रीसाठी होऊ दिले त्याने
युध्दात स्वतःचे वध
मैत्री
जसे कृष्ण आणि पार्थ
भाव कसे निःस्वार्थी
कृष्ण भगवान बनले
मित्र अर्जुनासाठी सारथी
