मैत्री
मैत्री
1 min
187
*मैत्री*
मैत्री
अल्लड अवखळ
पाण्यासारखी निर्मळ.....
मैत्री
सागरासारखी खोल
नाही त्याला मोल.....
मैत्री
मायेची हो बरसात
एकमेकांच्या अंतरात.....
मैत्री
जीवनाचे सुंदर पान
किती तरी छान.....
मैत्री
जसे पाव्यातील सूर
आनंदी सप्त मधूर.....
मैत्री
सुवासिक फूल
नाही तिथे हूल......
मैत्री
वाचनकट्टा आनंदाचा
दिल्या घेतल्या वचनांचा....
मैत्री
पवित्र निर्मळ नदी
नाही होत वाद कधी.....
मैत्री
खांदा आहे विसाव्याचा
हिशोब होतो सुखदुःखाचा...
