STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मैत्री

मैत्री

1 min
231

मैत्री असावी अशी

पावसाने पडलेल्या झाडावरच्या पानावर

बसलेल्या दवबिंदूसारखी।

दुरून देखील चमकणारी।

मैत्रीत असावा गोडवा

एकही शब्द नसावा कडवा।

मैत्रीला असावा अर्थ

कधीही नसावा त्यात स्वार्थ।

मैत्रीने वाढावा शब्दाचा डोंगर

प्रत्येक शब्द गुंफावा मनोहर।

दुःखात द्यावी मैत्रिणीला साथ

कधीही न सोडावा तिचा हात।

मैत्रिणीच्या सुखात मानावा आनंद

आपले दुःख विसरून व्हावे बेधुंद।

मैत्रिणीची भाषा तिच्या डोळ्यात वाचावी।

आसवे दुःखाची तिच्या आपल्या ओंजळीत झेलावी।

मैत्रीत नसावे हेवेदावे

मैत्रीत नसावे उनेदुने।

मैत्रिणीने मैत्रिणीचे करावे सांत्वन

रागलोभाचे नसावे त्यात पदार्पण

तिच्या आनंदात मैत्रीत आपला देखील एखादा आनंदाश्रू गळावा

तिलादेखील मैत्रीचा खरा अर्थ कळावा।

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा


Rate this content
Log in