Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunita Anabhule

Others

1  

Sunita Anabhule

Others

मैत्री

मैत्री

1 min
123


ना रक्ताचे, ना नात्याचे, 

हे बंध रेशमाचे,

ना गरिबीचे, ना श्रीमंतीचे,

हे रंग समतेचे,

सदैव राहो, बंधन प्रेमाचे

या धरतीवर...


संकटकाळी धावून येती,

मदतीचा हातही देती,

नसे अपेक्षा परतीची,

दोस्तीच्या नात्याला देवू,

नाव अतूट प्रेमाचे, 

या धरतीवर...


बालपणीच्या जमाडीजमती, 

तारुण्यातील गुलाबी गमती

वृद्धत्वाची गुपिते जपती

आजही सारे निभावती,

चिरंजीव प्रेमाला ना,

लागो दृष्ट कोणाची, 

या धरतीवर...


प्रेमात पडता सहाय्य करती,

भल्या-बुऱ्याची जाणीव देती,

दुबळ्यांचा आधार होती 

असेच मैत्र सदैव राहो 

ही इच्छा मनीची।।

या धरतीवर...


Rate this content
Log in