मैत्री
मैत्री
1 min
186
सुंदर सुंदर असावी आमची नाती,
जे केवळ आमच्या मनाचेचं होती !!1!!
जाणीव नेणीव नं कळे दिवस राती,
जे स्वच्छ मनाच्या कलानेच जुळती !!2!!
स्नेहाचा गोडवा चीं केवळ गुंफती,
देण्या घेण्याचं काही नं बोलती, !!3!!
ऐशीही आमची प्रेमाची ख्याती,
दुजा भाव आमच्या कधी नसे चित्ती !!4!!
श्रीमंती गरिबी कधी नसे मनी,
अशी हीं मैत्री संतदास मानी !!5!!
