मैत्री
मैत्री
1 min
247
मित्रा मैत्रीवर आपुल्या
किती अन् काय मी लिहावं ?
जेंव्हा मैत्रीच्या व्हाव्यात बाता
जगाने आपणांस आठवावं
किस्से आपुल्या मैत्रीचे
गात राहावे गावाने
एक गावचं व्हावं स्थापन
मित्रा आपुल्या नावाने
जीव देण्या घेण्याची कधी
बात मैत्रीमध्ये नसावी
एकमेकांसाठी जगण्याची
आशा तिच्यात दिसावी
मित्रा गरीबी श्रीमंतीची
नको झालर त्या मैत्रीला
जिवाभावाच्या मित्राची
फक्त कदर त्या मैत्रीला
मैत्री उत्तरोत्तर वाढी लागो
दोन मांणसातली सदा
जात, धर्म, पंथ, प्रांताची
नको मैत्रीमध्ये बाधा
