मैत्री
मैत्री
1 min
12.1K
कशी असावी नाती, अशी असावी मैत्री
सारे काही असते, आपल्या सुख दुःखासाठी
दुसरा असतो कोणी आपला विचार करतो
आपल्या मनातले सारे डोळ्यात तो जाणतो
जाणलेल्या हळुवार मनाला हळुवार तो थोपटतो
आपले डोळ्यातले अश्रू तिथेच तो थोपटतो
बाजूला त्याला सारून आपले क्षितिज साकारतो
साकारलेल्या क्षितिजावर बिंदू तो ठरतो
भरलेल्या डोळ्यात त्याच्या ओळख आपण शोधतो
ओले आपले डोळे तो पुसून कोरडे करतो