STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

मैत्री

मैत्री

1 min
128

जीवन जगताना या संसारी

असे मैत्रीचे अनमोल नाते

सुख असो वा दुःख जीवनी

प्रत्येक प्रसंगी साथ देते


एकमेकांच्या आनंदातच 

जे स्वतःचा आनंद पाहते

येता संकट आपल्या मित्रावर 

लढण्या संकटाशी उभे राहते


मित्रासाठी जिथे असते

नियतीशी लढण्याची तयारी

अशा मैत्रीची तर आहे

प्रेमवेडी दुनिया सारी


असले मैत्रीत कितीही प्रेम 

तरीही दाखवत मात्र नाही

नसते कसलेच बंधन तरीही

असे साथ निभवण्याची ग्वाही


घेण्या जन्म एका पोटी

ज्यांना शक्य होत नाही

बनवून मैत्रीचं नातं ते

एकमेकांत भातृभाव पाही


Rate this content
Log in