STORYMIRROR

Pradip Joshi

Others

3  

Pradip Joshi

Others

मैत्री तुझी अन् माझी

मैत्री तुझी अन् माझी

1 min
114

मैत्री तुझी अन् माझी

अजून त्या दिसाची

घट्ट मनाने बांधलेली

सुख-दुःखात समरसलेली।।


मैत्री तुझी अन् माझी

दोन हृदये जुळणारी

ऋणानुबंध जपणारी

वेलीवर आयुष्याच्या।।


मैत्री तुझी अन् माझी

सर्वांना अचंबित करणारी

अर्ध्या वाटेवर न सोडता

आयुष्यभर साथ देणारी।।


मैत्री तुझी अन् माझी

सर्वांना हेवा वाटणारी

विश्वासाने साथ देणारी

एक मिसाल म्हणून जपलेली।।


Rate this content
Log in