मैत्री दिन
मैत्री दिन

1 min

236
मैत्रीचे हे बंध बांधले
घट्ट घट्ट धागे विणले
नको कशाचे बंध येथे
फक्त प्रेमाचे कोश विणले
वेळ काळाचे नाही वावडे
शब्द न येती इथे वाकडे
अडचणीला धाव घेती
मैत्रत्वाचे सखे सोबती
राग लोभाची जाण नाही
प्रेमाला तर वाण नाही
अशी मैत्री दृढ असावी
शत जन्मात सय राहावी