STORYMIRROR

Punyashil Wankhade

Others

3  

Punyashil Wankhade

Others

मैत्री असते आधार आपला

मैत्री असते आधार आपला

1 min
412

जो असतो आधार, 

आणि कधी असतो हाहाकार ।

तो असला की, असते नुसती मेजवानी,

आणि एकत्र असलो, 

की मग चालू होते आमची आणिबाणी ।।


जेव्हा असतो तो सोबत आपल्या,

तेव्हा कळू लागते जीवनातील मजा ।

हळूहळू रस वाढत जातो हरएक क्षणाचा,

विसरतो आपण अशावेळी जीवनातील सगळी सजा ।।


असतं ज्याला माहिती आपलं प्रत्येक secret ,

जो कधीही पाडू शकतो आपली wicket ।

तोच तर असतो व्हिलन आपला,

आणि तोच असतो पाठीराखा आपला ।।


वर्णन करता त्याचे शब्द अपुरे पडतील,

कारणं तोच असतो

ज्याला आपल्या भावना कळतील । 

म्हणून प्रत्येक नातं हे 

प्रेमासोबत भरलेलं असावं मैत्रीनं ।

ज्यात असते सुखदुःखांची साठवण,

अन प्रेम असते भरभरून।।


अशा या गोड नात्यालाच मैत्री 

असे म्हणतात ,

जी सोबत असते नेहमी आपली 

यारी बनून ।। 


Rate this content
Log in