STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

मैत्रिचे गणित

मैत्रिचे गणित

1 min
434

मैत्रिचे गणित काही औरच आहे

गर्दित कुठेही नजरानजर होता

आनंदुन जातात चार डोळे

ऊंचावले जातात दोन हात 

दोघींचेही नकळत

भेटण्या पावले पडतात भरभर

गर्दितुन वाट काढत

भेटता पहिले वीस कर अंगुल्या 

न एक ही शब्द फुटे दोघींच्याही मुखातुन

नजरेतुनही वाचले जातात भाव सर्व मनींचे...


मग हळुच एक एक शब्द बाहेर पडतात मुखातुन

हसण्याच्या गडगडात विसरून जाता गर्दितला कलकलाट

अखंड बडबडीत सरता तास न् तास

निरोप घेते म्हणता म्हणता 

हळुच पुसल्या जातात डोळ्यांच्या कडा

पटकन् एक गिरकी घेत

दुरावल्या जाता वाटा विरूद्ध दिशेने

परत गर्दितला एक भाग होण्यास

घेऊन सोबत अगणित आठवणी अन् आनंद मनी...


Rate this content
Log in