मैत्री...
मैत्री...
1 min
334
मैत्री साजरी करायला
तसा कुठला दिवसच नसतो,
मैत्री तर तुमच्या प्रत्येक
कृतीतून दिसत असते.
सोबत असो वा नसो
आठवण मात्र नेहमी येत राहते,
कारण मैत्री साजरी करायला
तसा कुठलाही दिवस नसतो...
मैत्रीमुळेच तर चेहर्यावर फुलते हसू ,
मैत्रीमुळेच पुसले जातात दुःखाचे अश्रू .
मैत्री म्हणजे एक गोड सहवास असतो,
स्वार्थाचा तेथे मागमूसही नसतो.
कारण मैत्री साजरी करायला तसा
कुठलाही दिवस नसतो,
मैत्रीमध्ये नेहमीच प्रेमाचा
ओलावा असतो !
