STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

मैनेची कथा

मैनेची कथा

1 min
575



गावी आली रहायला

शहराकडची मैना.

      गरमी नि उकाड्याने

      तिची झाली खुप दैना.

कुलरची हवा गार

तिला कुठेच मिळेना.

     काय करावा उपाय

     काही तिला समजेना.

गेली खुपच दमून

पाणी प्यायला गावेना.

      दुरुन पाहतो राघू

      त्याला काही राहवेना.

जागा दाविली मैनेला

सारेच तिथे होते ना.

      गार सावली झाडाची

      खोप्याची सोय झाली ना.

दाने दुणे,चारापाणी

वाडग्यात होतेच ना.

      पाहून सारी व्यवस्था

      आनंद खुप झाला ना.

विसरली कुलरला

उकाडाही जाणवेना.

      राहू लागली गावात

      परत काही जाईना.


Rate this content
Log in