मैदाने हवी
मैदाने हवी
1 min
121
देव बप्पा एक
प्रश्न आहे तुला
खेळायचं कुठे आम्ही
एवढं सांग आम्हाला
कुठे आहेत का
ठेवली सांग मैदाने
हडप केली ज्यांनी
ती आहेत सैताने
जरा पण आमचा
विचार नाही केला
मैदानी खेळ नाही
घरात बसवून ठेवला
तूच सांग देवा
काय करायचं आम्ही
मैदाने उरतील याची
कोणी देत नाही हमी
आरोग्य आमचं
कसं रे जपलं जाईल
मोबाईलवर खेळून
डोळ्याला चष्मा येईल
कसे राहू निरोगी आम्ही
सांग ना रे देवा
कसरतीसाठी आम्हाला
मैदानीच खेळ हवा.....
एवढं देवा ऐकून
मैदाने रे दे आम्हाला
बदल्यात काय हवं
ते देतो आम्ही तुला....
