मायपरी
मायपरी
1 min
329
नविन पाहुणा घरी येणार
बातमी मला समजली
नविन पंख फुटल्यागत
मन जोगत माझ्याच दुनियेत फिरू लागली....
या दुनियेत ती आली
जादुची छडी घेऊनी
या काली माहाकाली छु मंतर करत
घेऊन गेली मज आनंदी जीवनात...
डगमगले कधी मी
सामोरी येते ती
हसवत मला
परतवुन आणते परत ह्या आनंदी जीवनात...
मी तीची माय
ती माझी माय
दोघीच एकमेका
तयार करता आपुली मायपरी दुनिया...
