मायेची सावली
मायेची सावली
1 min
330
आईच्या छायेत लेकरा मिळते सावली
उभा जन्म माया, देतच राहते ती माऊली
कितीही झालो मोठा, तरी तिच्यासाठी कायमच मी बाळ
स्वत: खस्ता खाईल, न होऊ देईल मुलांची आबाळ
लहान होतो तेव्हा फक्त आई हेच विश्व असायचे
दिवसभर तिच्याच भोवती घुटमळत बसायचे
आता बदलले आपले विश्व, झाले आभाळाएवढे मोठे
मायेची सावली मात्र आईच्या पदरातच भेटे
जरी फिरलात जगभर, गाठली यशाची शिखरे
ध्यानी ठेवा, स्वर्ग आईच्या पावलांजवळच खरे
