मायेची पाखरं
मायेची पाखरं
1 min
1.4K
झालं सारं ओलचिंब
झाली सारी आबादानी
भिजली मायेची पाखरं
गेलं घरटयात पाणी ------ ||
यंदा तरी होऊ दे रे
सारं काही ठिक ठाकं
हिरव्यागार रानातूनं
सुख समृद्धीच पीक ----||
पाखरांचे थवे सारे
उडूनिया गेले दुर
प्रलय तुझा रे पाहूनं
मनी उठते काहूरं ----- ||
अंद धुंद सुटे वारा
मुळे झाडाचे उन्मळी
पडे गाराचा तडखा
प्रीत तुही अवकाळी ----- ||
जरी येशील पावसा
नको भूतागत वागू
जीव झाडाला टांगला
माया तुला कशी सांगू ------ ||