मायेची पाखर
मायेची पाखर
कोसळणार्या धारासमुद्राला आले उधाण
दुथडी भरून वहात आहे नदी तिलाही आला पूर
दूर जाता आई बाबा मनी एक हुरहूर मन होते सुन्न
वाटतं आईने मारावी हाकलाभावी बाबांच्या हळूवार स्पर्शाची साथ
झोकून द्यावे बिनधास्त कुशीत दिसते
डोळ्यात पाणी हास्य त्यांच्या मिशीत
कष्टाने वाढवले कधी नाही केली तक्रार
अनेक अडचणी आल्या केली आईने मात
ठेवून दगड छातीवर जाता लेक सासरी
क्षणात ओसाड होउन जाते माहेरची ओसरी
देता आशीर्वाद हिरवीगार तुळस राहू दे सासरच्या अंगणात
कावरेबावरे मन सांगते तुम्हीच घ्याना जन्म लेकीच्या प्रांगणात ॥
