STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

मायेच माणूस...

मायेच माणूस...

1 min
178

ती हंबरते दिसता तिचं मायेच माणूस ,

वासरासारखं प्रेम करते दिसता मायेच माणूस ...

जीवाशिवाची जोडी राबते उन्हातान्हात,

पोळा येताच देतो अनंत धन्यवाद मायेच माणूस...

तो रक्षण करतो घराचे परक्यांस अडवतो,

शेपटी हलवत लाडात येतो दिसता मायेच माणूस...

म्याऊ म्याऊं करत चाखते वाटीतले दूध,

गोजीर रूप तिचं जीव लावते तिला मायेच माणूस ...

पक्षी असूनही आवाजात माणूस बोलतो ,

ज्यांच्या घरी असतो बोलून जोडतो मायेच माणूस...

प्राणी प्रेमाने असते एकनिष्ठ नेहमीच माणसांशी ,

प्रेमाने प्रेम जोडत जाते जगी मायेच माणूस ...


Rate this content
Log in