STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

मायबोलीचा पोवाडा

मायबोलीचा पोवाडा

2 mins
188


(नमस्कार ! मायबोली म्हणजे मातृभाषा. भाषा आणि मराठी माती यांचा अतिशय जवळचा संबंध. आपण सर्वच २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो. तसेच मराठेशाहीचा पाया रोवणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून मी हा पोवाडा लिहिला आहे. )


करूनी पहिले नमन गणेशाला आ आ आ ssss

आ आ आ आ आ हा sss



करूनी पहिले नमन गणेशाला

शारदे मातेला, नतमस्तक महाराष्ट्राला

वंदन करू मराठी मातीला sss हो ssss जी जी जी रं जी जी जी



महाकवी लेखकाचा सोहळा

पाहण्या जन झाले गोळा

ऐका जनं तुम्ही एक

माझ्या मराठीचे कौतुक

ही भाषा आहे हो गोडं

नका पडू देऊ तुम्हा कोडं



*सुरते* :- 

नका पडू देऊ तुम्हा कोडं अ अ अ ss जी जी जी रं जी जी जी रं दा जी रं जी जी जी



सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान हे रत्न

रात्रीच्या गर्भातून मायबोलीचा पावन यज्ञ

ज्ञानपीठ पुरस्कार जेता

नटसम्राट रचयेता..



*गद्य* :- 

ज्यांनी *कुसुमाग्रज* या नावाने काव्यलेखन केले ; त्यांचे खरे नाव होते *विष्णु वामन शिरवाडकर* .



मराठी साहित्यात मानाचा शिरपेच खोवला हो sssss जी जी जी रं जी रं दा जी रं जी जी जी..



*सुरते* :- मानाचा शिरपेच खोवला हो ssss जी जी जी जी रं दा जी रं जी जी जी



*गद्य* :- 

महाराष्ट्राच्या मातीतल्या कणाकणाचं लाडकं कुलदैवत म्हणजे *श्री छत्रपती शिवाजी महाराज* होय. मराठी मातीत जो जन्माला आला तो प्रत्येक माणूस छत्रपतींचा ऋणी आहे. नुसतं *छत्रपती शिवाजी महाराज* नाव जरी घेतलं तरी रक्त सळसळतं अशा कुलदैवताला *त्रिवार मानाचा मुजरा* 



महाराष्ट्र भूमी शिवबाची

लढवय्ये शूर मावळ्यांची 

 हर हर महादेव , हर हर महादेव

बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय



सह्याद्रीचा कडा दुमदुमला

शत्रुसंगे गनिमी कावा केला

मराठा तितुका मेळविला

मराठेशाहीचा पाया रोवला

गडकोटी भगवा फडकला ss आ आ आ आ आ आ 



*सुरते* :- 

गडकोटी भगवा फडकला हो sss जी जी जी रं जी रं दा जी रं जी जी जी



देव देश धर्मासाठी ई ई ई ई ई ई ई ई हा हा हा sss हा 



देव देश धर्मासाठी बांधीले तोरण स्वराज्याचे

भगव्या वादळा तुला 

शाहीर विनी करते मानाचा मुजरा हो sss जी जी जी रं

जी रं दा जी रं जी जी जी



Rate this content
Log in