मायबोली मराठी
मायबोली मराठी
1 min
167
हि गोष्ट असे सार्थ अभिमानाची
महाराष्ट्र देशाच्या बोली भाषेची
गाठीशी आहे पुण्याई पूर्वजन्माची
मराठी असे मायबोली अमुची
उब इथे सह्याद्रीच्या डोंगराची
सांगते कथा शिव पराक्रमाची
सहज अश्या तुकारामाच्या अभंगाची
मराठी असे मायबोली अमुची
कविता आम्हा सांगते कुसुमाग्रजांची
तळमळ सावरकरा मातृभूमीची
अमृताहुनी गोड पदवी ज्ञानेशाची
मराठी असे मायबोली अमुची
मम्मीने घेतली जागा आईची
का भासे कमतरता शब्दांची
प्रतीक्षा सरकारी अभिजात दर्जाची
मराठी असे मायबोली अमुची
