मायावी गुलाब
मायावी गुलाब
1 min
12K
गुलाबाचे फुल
सर्वांच्या आवडीचं
प्रेमात नेहमी
पहिल्या पसंतिचं
तुलना ह्याची
सदैव सौंदर्याशी
गुरूपूर्णिमेला शोभे
सद्गुरुंच्या चरणाशी
ह्याच्या भोवती फिरती
फुलपाखरं स्वच्छंद
ह्याच्याच पासून बनतो
औषधी गुलकंद
गुलाब वाढवतो
कार्येक्रमाची शान
फुलांमध्ये मिळतो
नेहमीच वरचा मान
