STORYMIRROR

Pradip Kasurde

Others

4  

Pradip Kasurde

Others

माय

माय

1 min
625

आईच्या छायेत । संसार फ़ुलला । 

मोगरा खुलला । अंगणात । 


दिसरात बाप । उन्हात खपला । 

संसार जपला । माय संगे । 


फाटका खाटला । चिंधीचिंधी जोडी । अभंगाची गोडी । भाकरीला । 


जिंदगानी सारी । कष्टाचं रं जिणं । 

आयुष्याच सोनं । तुझ्या पायी ।



Rate this content
Log in