माय नसतांना
माय नसतांना
1 min
212
माय नसताना
त्रिलोकीचा जरी स्वामी भिकारी माय नसताना।
जणू सर्वस्व हरलेला जुगारी माय नसताना ।।१।।
भिती नाही उतरतांना मनाशी फक्त ही चिंता।
'कसे होईल बाळाचे, बिछानी माय नसताना' ।।२।।
स्वराज्याची उभारावी गुढी इच्छा असे श्रींची।
कशी सत्यात उतरावी जिजाई माय नसताना ।।३।।
बळी शेतास नागरतो, वखरतो, पेरणी करतो।
मिळे कैसे जगा खाण्यास धरणी माय नसताना ।।४।।
जयाच्या प्रेम लीलेने जगाला वेड लावियले।
कुणी सांभाळले असते यशोदा माय नसताना ।।५।।
