माय मराठीचे गीत गाऊ
माय मराठीचे गीत गाऊ
गात राहू गीत माझिया मराठीचे
जन्म महाराष्ट्रात भाग्य ललाटीचे।।धृ।।
गात राहू...
मराठमोळं लेणं ल्याली
अलंकृत देदीप्यमान झाली
बहुविध रूपे प्रकटले स्थान तिचे।।१।।
गात राहू...
रुपानं साजरी अमृताची गोडी
भल्यभल्यांची काढून ती खोडी
ठसा उमटवी लेऊनी पंख प्रतिभेचे।।२।।
गात राहू...
मराठी अमुची असे मायबोली
तिचीच राहो सत्ता सभोवताली
तिच्यासाठीच आम्ही जगायचे।।३।।गात राहू...
बहुविध भाषा बहुविध प्रांत
तिच्या पुढे नसे कशाचीही भ्रांत
तिचेच दिव्यत्व अंतरंगात साचे।।४।।
गात राहू...
ज्ञानेश्वर, सावरकर, शिरवाडकर
लाभले जयांना प्रतिभेचे तुझे कर
लिहिले त्यांनी तव बोल कौतुकाचे।।५।।
गात राहू...
