माय मराठी
माय मराठी
1 min
449
माझ्या मराठी भाषेला गा
लकेर प्रेमाची
फोड अमृताहूनी गोड
मधू भरल्या थेंबाची
झोका वादळात घेई
तिचे शब्दं सान थोरं
दाटे सुगंध अक्षरांचा
आम्र तरुचा जसा मोहरं
कधी मुक्ताफळे उधळी
कुठं होई काटेकोर
वाटे साऱ्यांना अपूर्वाई
राही सदा म्होरं म्होरं
भान अभंगाचे धरी
नाचे भारूडी किर्तनी
सांडे शाई डफातूनी
हृदया मधली गाणी
हासे मराठी गालात
खेई फुगडी रानात
तिचा वारसा अनोखा
राघुला भेटला दानात
तिच्या बोलीभाषे मंधी
नाना विध मकरंद
गोड सहदाचा कांदा
असा मराठीचा रंग
