माय मराठी
माय मराठी
सह्याद्रीचा कणकण येथे,
भाषा बोलतो मराठी,
कड्याकपारी, गोदावरी,
वाहे शांत जल आमुचे मराठी
वीर मावळा, कोकण, मुंबई,
पुणे, विदर्भ, खान्देश सारा,
पंचवटीत राम बोले मराठी
मराठवाडा संभाजीनगर,
येथे माझी माय मराठी
महाराष्ट्राचे किल्ले येथे,
शिवराय राजे छत्रपती,
शिवार घूमतो, पक्षी बोलतो,
माय शुद्ध येथे मराठी
येथे जन्मती वीर मावळे,
राजे आमुचे शिवछत्रपती,
वीरता येथे जन्म घेते,
स्वाभिमान आमुचा शाहू छत्रपती
वाघाची डरकाळी मराठी
माय मराठीला वंदन करतो,
इंद्रायणी तीरी, संत ज्ञानेश्वर,
तुकारामाचा अंभग सारा,
सप्तसुर आळविती भाषा,
माय मराठीचा विठ्ठल
चंद्रभागेत, वाळवंट सारे
टाळ मृंदग, फुगडी येथे मराठी
विटेवर महावैष्णव,
पांडूरंगाची रुखमाई,
भाषा बोलते मराठी
