STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

माय -मावशी

माय -मावशी

1 min
13.8K

" माय मरो , मावशी जगो " हे बोल ज्या कोणी लिहिले।

भाच्याचे प्रेम सात्विक , सुंदर, त्यास मनोमनी जाणवले॥


आई पाजते दूध बाळाला, मावशी पाजे प्रेमामृत।

प्रेम लाभणे मावशीचे, हे बाळाचे पूर्वजन्मीचे सुकृत॥ 


ठेच लागता बाळाला, आई आठवून काढी बाळ गळा। 

कळ बाळाची पाहून, अश्रू मावशीच्या नेत्री घळाघळा ॥


माय - मावशी एकरूप जणू , एक विचारी, एक समान।

देवानेच बनवले रूप हे , आईचे प्रतिबिंब लहान॥


माता नाही लाभली जगी जरी, मावशी राहावी निरंतर।

हीच प्रार्थना मनोमनी, कधी न पडावे नात्यामध्ये अंतर॥


मावशी मागे भाग्य भाचरां , प्रेम अखंड जपतसे मनी।

सौख्य - संपदा, आयुर्बल द्यावे, हीच विनवणी ईश्वरचरणी ॥



Rate this content
Log in