माय माझी मराठी
माय माझी मराठी
1 min
237
असे आमुची माय मराठी
गोजिरी लाजरी सोपी सरळ।
मधुर असे आमुची मातृभाषा
सुंदर अवखळ लबाड तरी प्रेमळ।।
काना,मात्रा उकार,वेलांटी
अनेक असती तिचे अलंकार।
लायल्यावर खुलून दिसते
बदले अर्थ वारंवार।।
समजण्यास सोपी असे अति
अक्षर शोभे तिजला "ळ"।
नसे कुठल्या भाषेमध्ये,
मराठीत असे केवळ।।
माय शब्दाचा महिमा अपार
प्रिय असे आमुची बोली मराठी।
आम्हाला मिळे भाग्य बोलण्या
बोल तुझे सदा ओठी।।
ज्ञानदेवाने इला उद्धरली
अमृतापरी गोड या जगती।
विकासासाठी झटूया ईच्या
गाऊया जगी ईची महती।।
कोकणी ,मालवणी ,सातारी
पुणेरी,नगरी,कोल्हापुरी
विविध बोली भाषा परी
माय मराठी त्यांची खरी।।
