माय लेक
माय लेक
1 min
1.4K
किती निरागस लेक तिची
बिलगली तिला प्रेमाने
झेलेल ती अफाट वेदना
परी वाढवेल तिला मायेने
लेकीच्या नजरेतले
ओळखते ती भाव
देऊन मायेची ऊब तिला
सोसते स्वतः सारे घाव
माथेवरच्या कुंकवाचा ही
नाही तिला भान
लेकीच भविष्य सूरेख घडावे
याच गोष्टीकडे आहे तिच ध्यान
फाटक्या साडीतच
राबते ती माऊली
लेकीला देते तिच्याच
मायेची सावली
डोक्याच्या केसालाही
ती लावत नाही कंगवा
स्वप्न पाहते ती लेकीचं जीवन
इंद्रधनुष्या सारखा रंगावा
लेकीची आणि आईची
अशी जगावेगळी असते माया
लेक म्हणजे आईच्याच
मुखातली आईसम छाया
