माऊली
माऊली
1 min
288
वय झाले देहाचे तरी चिकाटी जाईना,
चित्त लागले देवाचे जाईन मी वारीला।
चंद्रभागा भागत आहे उरी घेउनिया भक्ती,
पाप साऱ्यांचेच धुते हीच तिला सक्ती।
लाखो हजारांची वर्दळ तिथ मेंढरांची गर्दी,
दर्शन विठ्ठलाचे व्हावे सर्व भक्तांची वर्दी।
अंतर कितीही असो नसे पाउलांना भीती,
वारी चालली पंढरी जन्मोजन्मीच्या या रिती।
चालताना फक्त साथ देते हो ही सावली,
ईथे प्रत्येकामध्ये दिसते फक्त माझीच गं माउली।।
