मात्रछाया
मात्रछाया
1 min
66
तू लवकर ये, तुला खुप भांडायचय.
मोठे पनानेच आता, तुला खूप रडवायचंय.
बोलशील मग बोबडी, लावशील अशी लाडी.
हसणं तुझ पाहण्या, लागेल मला गोडी.
आधी रांगशील नंतर चालशील, पहात माझ्या कडे.
दुडू दुडू चालणाऱ्या पावलांना भिती नाही, कित्येकदा ती पडे.
हलकसं रडणं पुन्हा प्रयत्न, निरागस सारा खेळ.
सोबत तुझ्या खेळण्या आनंद, आयुष्याचा मेळ.
खुप काही शिल्लक, सारी स्वप्ने तुझीच आहेत.
पुन्हा एक आई मिळाली मला, माझ्या मुलीच्या छायेत.
