मातृभावना
मातृभावना
1 min
423
तान्हुल्या तुला
सांग काय देवू
तुझ्या जीवनाचे
कसे दान मागू
हंबरडा अंतरीचा
पान्ह्यातुनि वाहे
कुशीत घेण्याचे
स्वप्न भंगु पाहे
भवानीचे रुप
आता मी घेईन
तुला रक्षण्याचे
देते वचन
कडकडुनी माया
फुटतो ऊर
या पातकाला
करते विरोध
तुझ्यासाठी मी
जगासी लढेन
स्वातंत्र्य माझे
तुझ्यासवे जपेन
आनंदाच्या पुरात
न्हाऊन निघाले
तुझ्या चाहुलाने
मातृत्व सुखावले
