माती
माती
सगळ अस लपवतोय की, दिसत नाही काही.
शोधण्यात विसरतो, टीमक्या मशालीला घाई.
काजव्याला किंमत तिथे, चिरतो कट्ट हा काळोख.
हिंमतीची दाद त्याच्या, एकटा जिंकतो मूलोख.
आम्हा अंधाराची घाई, समज झाले आता खूप.
माणुसकीचा भरवसा, पाखडन्या विश्वासाला सूप.
आम्हा आमचीच भीती, घात होईल अंधारात.
सगळे लपून होईल, घाई सावरे दिवसात.
जागा तीच परी, फरक आहे दिसराती.
क्रूरकृती कर्माने तिथे भंगुन जाते माती.
बनत जातात गोष्टी, वाढत जाते समीकरण.
उजेडाला वश करण्या, अंधार करेल हरण.
नसेल कोणालाही भीती, बदलतील मग रिती.
येईल प्रकाश हा थेट, पावन होईल सगळी माती.
