STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

4  

SHUBHAM KESARKAR

Others

माते !!

माते !!

1 min
404


तूच भवानी माझी आई

भवानी माझी आई

ह्या जगतेची तू माई

आमच्या विठुची रखुमाई!!धृ!!


उद्धार तुझ्या ह्या जगती

करी दृष्टांचा संहार

कित्येकांची तू जननी

माते तुच अंबाबाई!!१!!


कालिकेचे हे रूप जाणं 

माझ्या मातेचे स्वरूप

ह्या सकळांची तू आई 

माते तुच अंबाबाई!!२!!


नसे हा मनुष्यभेद

माते तुझ्या ह्या अंगणी

घेई करुनि सेवा माते

माझ्या दोन्हीं हातांनी!!३!!


नवरात्रीचा हा सण 

किती रंगीला रंगात

सोबत दांडियाची साथ

घुंगरू वाजती पायात!!४!!


आलो तुझ्या चरणी माते

घेई आम्हा जवळी

चुकीचे बोल कधी न येवो

आमच्या सर्वांच्या मुखी!!५!!


रूप तुझे पाहुनी माते

मिळे सुख समाधान

होई जीवनाचे सार्थक

ह्या नवरात्री दिन

ह्या नवरात्री दिन!!६!!



Rate this content
Log in