STORYMIRROR

Smita Murali

Others

4  

Smita Murali

Others

मासिक पाळी

मासिक पाळी

1 min
665

आईच्या गर्भात

स्त्रिबीज फुललं

वाढीच्या टप्याने

हळूहळू खुललं


यौवनाच्या बहराने

खुलत गेली कळी

हळू एका टप्प्यावर 

सुरु मासिक पाळी 


अचानक बदलाने

घाबरली जर कळी

समजून सांगा तिला

 काय ही मासिकपाळी 


अशुद्ध रक्त वाहते

चक्र चाले माहेवार

शरीराला येई थकवा

जीव होई खूप बेजार


विटाळ ना मासिकधर्म

स्त्रीत्वाचे असे ते अंग

निर्मिती ही बिजांडाची

वंशवेलीला चढवी रंग


पॅडचा करावा वापर

स्वच्छतेचे हवे भान

शेंगा गुळ खावून

आरोग्य जपावे छान


Rate this content
Log in